रायगड पोलीस दलात ९५ पदांसाठी पोलीस भरती २९ मार्चपासून सुरू होत असून पोलीस शिपाई भरतीकरिता ८ हजार ११२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापकी १२८२ महिला उमेदवार असून १०९ उमेदवारांनी बॅन्ड पथकासाठी अर्ज सादर केला आहेत.
सदरची भरतीप्रक्रिया शारीरिक मोजणी व मदानी परीक्षा ही ६ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. प्रतिदिन एक हजार उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असून ६ एप्रिल रोजी १२८२ महिला उमेदवार असून १०९ बॅन्ड पथकासाठी आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणी पोलीस मुख्यालयातील मदानात सकाळी ६ वाजल्यापासून भरती प्रक्रियेतील शेवटच्या उमेदवाराची शारीरिक चाचणी पूर्ण होईपर्यंत चालू राहणार असून महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार उमेदवार धावण्याची चाचणी सकाळी ९ वाजेपर्यंत चालू राहणार असून उर्वरित सदर दिवशीच्या उमेदवारांची चाचणी ४.३० वाजल्यापासून पुढे शेवटच्या उमेदवाराची शारीरिक चाचणी पूर्ण होईपर्यंत चालू राहणार आहे. सदर भरती प्रक्रियेकरिता रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताकामी तनात केले असून भरतीच्या ठिकाणी व्हिडीओग्राफी, सीसीटीव्ही कॅमेरे यांच्याद्वारे सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी काही लोक (दलाल) हे उमेदवारांशी संपर्क साधून पशाच्या मोबदल्यात पोलीस भरतीत निवड निश्चित करण्याचे प्रलोभन दाखविण्याचे प्रकार करण्याचा प्रयत्न करतात. पोलीस भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी व गुणवत्तेवर आधारित आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. भरती प्रक्रियेत असे गरप्रकार होत असल्यास खालील नमूद अधिकारी यांचेकडे संपर्क साधावा. राजेंद्र दंडाळे ९९६७४९७४४७, आर.एल.पवार ८६०५११२३३३, सुवेझ हक ९८२३६२३२१०, प्रशांत बुरडे ९८२१०५७५५८, सुनील कलगुटकर ९८९२२३८५९७ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.
पोलीस भरतीच्या वेळी प्रलोभन दाखविणाऱ्या व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक व इतर माहिती तसेच प्रलोभन दाखविण्याचे प्रकार निदर्शनास आणून दिल्यास त्याबाबतची माहिती वरील अधिकाऱ्यांना तात्काळ द्यावी. सदर माहिती तथ्य आढळून आल्यास माहिती देणाऱ्यांना या कार्यालयाकडून ५ हजार रुपयांची रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा