परभणी पोलीस दलातील १४४ पदांसाठी उद्या (शुक्रवारी) भरती प्रक्रिया सुरू होत आहे. ६ हजार ४०२ अर्ज भरतीसाठी आले. पकी सध्या ३ हजार उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात नवीन निर्माण झालेले पोलीस ठाणे आणि इतर विभागात असलेल्या रिक्त पदांसाठी प्रथमच भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या दरम्यान उमेदवारांमध्ये झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पाटील यांनी पत्रकार बठकीत माहिती दिली. भरती प्रक्रियेसाठी तब्बल ६ हजार ४०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवार सध्या प्रवेशपत्र मिळत नसल्यामुळे संभ्रमात आहेत. परंतु सध्या केवळ तीन हजार उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी प्रवेशपत्राबाबत निश्चित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
६ ते १२ जून दरम्यान कागदपत्रांची तपासणी, तर १५ जूनपासून शारीरिक चाचणी घेण्यात येईल. जे उमेदवार कागदपत्र चाचणीला हजर राहू शकले नाहीत, अशा पुरुष उमेदवारांसाठी ११ जून, तर महिलांना १२ जूनला हजर राहता येणार आहे. भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी अडचण असल्यास अतिरिक्त अधीक्षक श्रीमती नियती ठाकर (७७९८८८५१७६), गोरे (९९२३३००५५०) या क्रमांकाशी संपर्क साधावा आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. सर्व भरती प्रक्रिया वेळापत्रकानुसारच पोलीस मुख्यालयात होणार आहे.

Story img Loader