शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून दापोली तालुक्यातील १७ गुंतवणूक दारांची तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील ५ जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील  मुख्य सूत्रधाराला दापोली पोलिसांच्या पथकाने बंगळूरु येथून अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या सर्व प्रकारामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस; जाणून घ्या, कोणत्या राज्यात किती पाऊस पडला

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचनदी येथील निवृत्त प्राथमिक शिक्षिका  मनीषा विलास मालगुंडकर यांच्या घराच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील्स बसविण्यासाठी २०२०-२०२१  मध्ये जालगाव येथील संजय व राज काताळकर आले होते. त्यांनी मालगुंडकर यांना आम्ही आमचा पुतण्या हर्ष याचेबरोबर शेअर बाजारात गुंतवणूक करतो व भरपूर पैसे मिळवितो असे सांगत आमच्याकडे तुम्हीही गुंतवणूक करा असे सांगितले. मालगुंडकर यांच्या मुलाने यासंदर्भात खातरजमाही केली. हर्ष व जय अजय काताळकर, देव संजय काताळकर, संजय अनंत काताळकर, राज संजय काताळकर सर्व रा. जालगाव यांनी आमचा विश्वास संपादन करून तुमचे पैसे बुडणार नाहीत, तुम्हाला चांगला फायदा होईल असे सांगितल्याने मालगुंडकर यांनी २५ मे २०२३ रोजी  व वेळोवेळी २३ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठविले.

हेही वाचा >>> Ladki Bahin Yojana : रवी राणांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या…”

दरम्यान हर्ष काताळकर याने फायदा झाला असे सांगून १ लाख ७४ हजार रुपये परतावाही दिला. त्यानंतर मालगुंडकर यांच्या मुलानेही ८ लाख  तर पती विलास यांनी २ लाख रुपये हर्ष काताळकर याच्या खात्यात जमा केले. अशा प्रकारे हर्ष काताळकर याने दापोली तालुक्यातील अन्य १४ जणांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एकूण ४ कोटी ९९ लाख रुपये जमा केले. त्यानंतर चांगला परतावा सोडाच मुळ रक्कमही परत न मिळाल्याने अखेर मालगुंडकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात हर्ष व  अजय काताळकर, देव संजय काताळकर, संजय अनंत काताळकर, राज संजय काताळकर यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या सर्वावर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र यातील प्रमुख सूत्रधार हर्ष काताळकर (वय २८) हा १५ सप्टेंबर २०२३  पासून दापोली बाहेर पळून गेला होता.  या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगाधर यांनी तांत्रिक तपास करून हर्ष याला बंगळूरु (कर्नाटक) येथून अटक करून त्याला दापोली येथे आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.