धाराशिव – तुळजाभवानी देवीचे प्राचीन मौल्यवान दागिने चोरी पकरणात अखेर सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महंत हमरोजीबुवा , गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा या चार महंतासह मृत  सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचारी या सात जणांवर गुन्हा नोंद  झाला. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आदेशानंतर आठवडाभराने तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली जाणार आहे.

हेही वाचा >>> “मोदी सरकार लोकशाहीचा खून करतंय”, खासदार निलंबनावरून नाना पटोले यांची टीका, म्हणाले…

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा

कलम ४२०, ४०६, ४०९, ३८१ व ३४ आयपीसी नुसार तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतंत्र तपास समिती गठीत केली आहे.  आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत गुन्हा नोंद करण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर उपसभापती डॉ नीलम गो-हे यांनी तक्रार देऊनही गुन्हा का नोंद होत नाही अशी विचारणा करीत अधिवेशन संपण्यापूर्वी गुन्हा नोंदविण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले होते.

हेही वाचा >>> “पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही?” बच्चू कडू यांचा संघ आणि भाजपला सवाल

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागदागिने आणि अलंकार आहेत. विविध राजे-महाराजे, संस्थानिक, मुघल बादशाह, निजाम, पोर्तुगीज, डच आदींनी देवीला मोठ्या भक्तीभावाने अर्पण केलेल्या प्राचीन अलंकारांची संख्याही मोठी आहे. भाविकांनी मागील १४ वर्षांत श्रध्देपोटी देवीचरणी अर्पण केलेले वाहिक सोने २०७  किलो तर अडीच हजार किलो चांदी आहे. शिवकालीन दागिने, वेगवेगळ्या राजदरबारातील नाणी असा समृध्द खजिना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात होता. त्यावरच मंदिरातील महंत, मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच काही सेवादार्‍यांनी डल्ला मारला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंदिरातील सोने-चांदीचे दागिने व अलंकाराची तपासणी करण्यासाठी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली 16 जणांची समिती गठीत केली होती. या समितीने जुलै महिन्यात आपला सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार महंतांच्या ताब्यातील दागदागिने, सेवेदारी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अधिकार कक्षेत असलेले मौल्यवान प्राचीन अलंकार याची इनकॅमेरा तपासणी केली. त्यात अनेक प्राचीन, दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार गहाळ असल्याचे समोर आले आहे. तर काही अलंंकार नव्याने त्या ठिकाणी ठेवून शेकडो वर्षे जुना असलेला दागिना गायब करण्यात आला आहे. अहवालानुसार जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी आठ दिवसांपूर्वी।तुळजापूर पोलिसांना दिले होते.

Story img Loader