सोलापूर : शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला असून, याबाबत तिच्या वर्गातील विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात पीडित मुलगी विज्ञान शाखेत अकरावीच्या वर्गात शिकते. पंधरा दिवसांपूर्वी वर्गात गोंधळ सुरू असताना पीडित मुलीने पाठीमागे वळून पाहिले असता, एका मुलाने तिला उद्देशून अश्लील हावभाव केले होते.

हेही वाचा >>> Kiran Mane : “भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत..”; किरण मानेंचा संताप

rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

मुलीने संयम पाळल्यानंतर पुन्हा त्या मुलाने दुसऱ्यांदा तिचा विनयभंग केला. मुलगी महाविद्यालयात दुपारी स्वच्छतागृहाकडे जात असताना संबंधित मुलाने तिला अडवून अश्लील भाष्य केले. नंतर पुन्हा त्याने असेच कृत्य केले. तेव्हा मात्र मुलीने घरी हा प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या भावाने महाविद्यालयात येऊन संबंधित मुलाला जाब विचारला, तेव्हा हा प्रकार महाविद्यालयाच्या प्रशासनासमोर आला. पीडित मुलीनेही जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ चित्रण मागितले असता या कनिष्ठ महाविद्यालयाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्याचे उत्तर दिले. याबाबत शैक्षणिक संस्थांनी तातडीने ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.