सांगली : भारतीय संघाने न्यझीलंडला पराभूत करुन आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या दोन गटात मिरजेत जोरदार घोषणाबाजी झाली. यातून दोन गटात वाद निर्माण झाल्याने दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने न्यूझीलंडवर मात केल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते. याचवेळी दुसरा गट देखील त्या ठिकाणी आला. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी भारताचा विजय साजरा करणाऱ्या तरुणांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लाठीमार करत दोन्ही गटाला पांगवले.