उमरगा तालुक्यातील तुरोरी येथून गळ्यावर चाकू लावून अपहरण केलेल्या तीन अल्पवयीन मुलींना तातडीने शोधून काढण्यात उमरगा पोलिसांना यश आले आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून तिन्ही।मुलींना ताब्यात घेऊन सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी अत्यंत वेगात तापसचक्र फिरवून शाळकरी मुलींची आरोपींच्या तावडीतून मुक्तता केल्याबद्दल उमरगा पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील निलुनगर तांडयात राहणाऱ्या तीन अल्पवयीन शाळकरी मुलींचे ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथुन शाळा सुटल्यावर अपहरण करण्यात आले. एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबसमधुन आलेल्या कांही लोकांनी मुलींच्या गळयावर चाकु ठेवला. चाकुचा धाक दाखवुन त्यांना बळजबरीने गाडीत बसवले असल्याचा संदेश उमरगा पोलिसांना प्राप्त झाला. कर्तव्यावर असलेल्या बीट मार्शल योगेश बिराजदार यांनी तातडीने वरिष्ठांना ही माहिती दिली. उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी लागलीच सर्व दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन घेत घटनेचे  गांभीर्य ध्यानात घेऊन तातडीने सूत्रे हलविले. बिराजदार यांना फोन केलेल्या व्यक्तींकडून अपहरणाची गोष्ट त्यांना कशी समजली याबाबत विचारपुस केली. त्यावर शाळेतील त्यांची मुलगी लक्ष्मी हिनेच ही गोष्ट कळवली असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>पंढरपूर जवळ लक्झरी बस आणि ट्रकची धडक; २ ठार ६ जखमी

सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने लगेच तपास सुरू केला. मुलीने केलेल्या फोनचे लोकेशन काढले. त्या फोनवर संपर्क केला एका महिलेने फोन उचलला. या नंबरवरून कुठल्या मुलीने फोन केला होता का? अशी विचारणा केल्यावर बसमध्ये शेजारी बसलेल्या १२ ते १३ वर्षाच्या मुलीने फोन केल्याचे उत्तर सदरील महिलेने दिले. बस कोणती आहे? स्कुल बस आहे काय? असे प्रश्न पोलिसांनी विचारताच पुण्याला जाणारी एसटी बस असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उमरगा बस स्थानकातून कोणकोणत्या बस पुण्याला गेल्या आहेत? आता कुठपर्यंत गेल्या असतील? अशी माहिती घेतली असता पुण्याला जाणारी ही बस दुपारी २ वाजता निघाली असून सोलापुर जिल्हयातील मोहोळच्या आसपास असल्याची पोलिसांना समजले. सकाळपासुनच तीन लहान मुली बसची वाट पाहत बसलेल्या होत्या अशी माहीतीही मिळाली. लागलीच मोहोळ बसस्थानक परिसरात गाड्यावर काम करणाऱ्या परिचित असलेल्या आदम भाभी यांना पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी संपर्क साधला. तीन लहान मुली मोहोळ बस स्थानकावर दिसल्यास तात्काळ थांबवुन ठेवावे असे कळवले. थोड्याच वेळात या मुली एका बसमधुन उतरल्या असल्याची व पंढरपूर रोडकडे निघाल्याची माहिती आदम भाभी यांनी दिली. तिन्ही मुलींना बसस्थानकावरच थांबवुन ठेवा असे निर्देश पोलिसांनी दिल्यानंतर.एक व्यक्तीच्या मदतीने मुलींना तेथेच थांबवून ठेवले. तेवढ्या वेळात मोहोळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांना घटनेची माहीती देण्यक्त आली. मुलींना मोहोळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. उमरगा येथुन तिन्ही मुलींच्या पालकांना पोलीस गाडीसोबत मोहोळ येथे पाठवुन सुखरूपरित्या मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले असल्याचे पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे ३ अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला व घरातून ५ हजार चोरत दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन बनविला मात्र पोलिसांच्या दक्षतेने हा बनाव उघड झाला असुन त्या मुलींचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. या तीन पैकी २ मुली ह्या ११ वर्षाच्या आहेत तर एक मुलगी १३ वर्षाची आहे. आमच्या नरड्याला चाकू लावुन आमचे अपहरण करण्यात आले आहे असे सांगून घ्या मुली पुणेकडे निघाल्या व त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन केला होता. ह्या मुली BTS-V ह्या कोरियन सिंगर व डान्स ग्रुपच्या फॅन होत्या, कोणत्याही स्तिथीत ह्या ग्रुपला भेटायचे असे म्हणत त्या तिघीनी अपहरणाचा बनाव करीत घरातून पळ काढला होता.