नांदेड : जिल्हाभर फिरुन शोध घेत पोलिसांनी सुमारे २५ लक्ष रुपये किमतीचे अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्याची माहिती समाज माध्यमावर नांदेड पोलीस दलाच्या “नांदेड पोलीस” या फेसबुक पेज व ट्विटर खात्यावर उपलब्ध आहे. संबंधितांनी ओळख पटवून सायबर पोलीस ठाण्यातून आपले फोन घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात मोबाईल फोन चोरीला जाण्याचे, हरवण्याचे असंख्य उदाहरणं आहेत. प्रामुख्याने आठवडे बाजार व प्रवासात मोबाईल फोन चोरीला जातात किंवा गहाळ होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडे अपवाद वगळता सर्वजण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरतात. अशा हरवलेल्या महागड्या फोनचा शोध घेण्याकरता पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.विविध पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणावरून २४ लाख ८१ हजार पाचशे रुपये किमतीचे १५७ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यापैकी काही फोन ओळख पटलेल्या नागरिकांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अन्य मोबाईल संचांच्या आय.ई.एम.आय. क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाच्या “नांदेड पोलीस” हे अधिकृत फेसबुक पेज तसेच ट्विटर हँडल वर उपलब्ध केली आहे. संबंधितांनी ओळख पटवून नांदेड येथील सायबर पोलीस स्टेशन येथून आपले फोन घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आता तक्रार देण्याची कटकट नको

वापरकर्त्याच्या हलगर्जीमुळे किंवा चोरट्यांच्या हातसफाईने मोबाईल फोन हरवतात, चोरीला जातात किंवा गहाळ होतात. यापुढे असे झाल्यास आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणे शक्य नसल्यास ‘सी.ई.आय.आर.’ या पोर्टलवर भेट देऊन आपल्या फोनची माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.बातमी सोबत छायाचित्र पाठवले आहे