वारकरी नितीन यादव याचा गळा आवळून खून करणाऱ्या पोलिसाने पोलीस ठाण्यातील रिव्हॉलव्हर चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली असून या गुन्ह्य़ात आणखी एक आरोपी असल्याचेही तपासात आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आषाढी एकादशीच्या वारीसाठी गेलेल्या नितीन अर्जुन यादव (३३ रा. वायफळ, ता. जत जि. सांगली) या वारकऱ्याचा मृतदेह तालुक्यातील नगर- सोलापूर रस्त्यावरील बाभूळगांव शिवारात सापडला होता. त्याच्या खुनाच्या आरोपावरुन मंगळवेढा (सोलापूर) येथील पोलीस कर्मचारी दत्ता गोरख भोसले याला अटक करण्यात आली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज, शनिवारपर्यत होती. त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. या गुन्ह्य़ात आणखी एक आरोपी राजेंद्र शिवाजी पाटील (रा. गुंडेगाव, ता. सांगोला, सोलापुर) हाही सहभागी असून त्याला अटक करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

आरोपी दत्ता भोसले याच्या मंगळवेढा येथील घरझडतीत पोलिसांना रिव्हॉल्व्हर सापडले, जिल्हा परिषद निवडणूकवेळी ज्या नागरीकांकडे शस्त्रे आहेत त्यांना ते पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश होते. असे जमा केलेले रिव्हॉल्व्हरच दत्ता भोसले याने पोलीस ठाण्यातुन चोरले, ते  कोणाचे आहे हे ओळखण्यातही आले आहे. ज्या दत्ता भोसले याला पोलीस ठाण्यात गार्डवर डयूटीवर, हत्यारांचे संरक्षण व आरोपी पळून जावू नये म्हणून ठेवले, तिथेच त्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले, हा प्रकार फारच गंभीर आहे.

तपासामध्ये दत्ता भोसले याने नितीन यादवचा खून कसा केला याची माहिती पोलिसांना दिली. यादवला संपवण्याचा विचार करुन त्यासाठी तो वारीवर असल्यापासून यादवच्या संपर्कात होता. त्याच्या सोबत राजेंद्र पाटील होता. दोघे स्विफ्ट कारमधून (एमएच १३ सीके ३०११) नितीनच्या पाळतीवर होते. नितीन मोटारसायकलवरून येत असताना कारने हॉर्न दिला, यादवला कारमध्ये नातेवाईक दत्ता भोसले दिसला. दोघांनी यादवला घरी सोडतो असे म्हणत कारमध्ये बसवले.निर्मनुष्य ठिकाणी यादवचा गळा आवळून त्याचा खून केला व मृतदेह त्याच गाडीतून कर्जत तालुक्यात आणून टाकला.

मयत नितीन यादवच्या घरची परिस्थिती चांगली होती. बागायत जमीन व ट्रान्सपोर्टचा व्यवसायामुळे पैसे भरपूर होते, आरोपी दत्ता भोसले याच्यावर मयताचा भाउ आणि इतरांचा मोठा विश्वास आहे, हे त्याला माहित होते, यामुळे गायब झालेल्या यादवचा तपास करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम मिळवण्याचाही भोसलेचा डाव होता. भोसलेला मदत करणारा राजेंद्र पाटीलला पकडण्यासाठी काल कर्जतचे पोलीस पथक गेले होते, मात्र तो घरी सापडला नाही.