सध्याच्या तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे असं म्हटलं तर तरी आतिशोयोक्ती ठरणार नाही. सोशल मीडियावर झटपट प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारची रील्स, व्हिडीओ तयार करत असतात. लाईक्स, कमेंट्स मिळवण्याच्या नादात तरुण- तरुणी असे अनेक प्रकार करतात, ज्यामुळे अनेकांचा त्यांच्या या कृत्याचा राग अनावर होत असतो. मात्र तरुण-तरुणी रील बनत असताना इतर कोणाचाही विचार करत नाही ज्यामुळे सामाजिक परिस्थिती बिघडेल याचे देखील ते भान ठेवत नाही आणि नको त्या चुका करून बसतात. असाच एक प्रकार धुळ्यात घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी रील बनवणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

धुळ्यात नेमकी काय घडली घटना?

धुळे शहरातील देवपूर बस स्थानक या ठिकाणी रविवारी एका तरुणाने मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने तयार केलेला एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ काही वेळातच चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनींसमोर येऊन एका हिंदी गाण्यावर नृत्य करीत असल्याचे दिसून आले होते, त्यानंतर नेटकऱ्यानी या तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात केली होती.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

पोलिसांनी नेमकं काय केलं?

ज्यानंतर धुळे पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन एलसीबीच्या पथकाने नरडाणा गावातून या तरुणाला ताब्यात घेतले आहे. राज पवार असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ज्या ठिकाणी त्याने हा व्हिडिओ तयार केला त्याच देवपूर बस स्थानक परिसरात नेऊन या विद्यार्थिनींसमोर त्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. ज्या ठिकाणी मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला होता त्या ठिकाणी घेऊन जात सर्व लोकांसमोर त्याची परेड काढत त्याला या सर्व मुलींसमोर माफी मागायला सांगितले यावेळी एका तरुणीने या तरुणाच्या चांगल्या कानशीलात लगावली असल्याचे देखील यावेळी बघायला मिळाले.