गुंडाच्या खुनात सहभागाचा आरोप असलेल्या निलंबित पोलीस शिपाई सुखदेव दिनकर गिरी याने दारूच्या नशेत महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गिरी याला अटक करून बुधवारी न्यायालयात उभे केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली.
गुंड जावेद मुल्ला याचा आडी येथे खून झाला होता. या खूनप्रकरणी गिरी याचा सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याला सेवेतून निलंबित केले आहे. गिरी सेवेत असताना त्याच्यासोबत काम केलेली महिला कॉन्स्टेबल सध्या पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहे. मोपेडवरून निघालेल्या महिला कॉन्स्टेबलचा गिरी याने पाठलाग केला. त्याने तिच्याशी अश्लील संभाषण सुरू केले. यामुळे रागावलेल्या महिला कॉन्स्टेबलने गिरी याच्याविरोधात फिर्याद दिली. शाहूपुरी पोलिसांनी त्याला अटक केली. वैद्यकीय तपासणी केली असता गिरी याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. याप्रकरणी गिरी याला आज दुपारी न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या विरोधात ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.
विनयभंग करणा-या पोलीस शिपायास अटक
गुंडाच्या खुनात सहभागाचा आरोप असलेल्या निलंबित पोलीस शिपाई सुखदेव दिनकर गिरी याने दारूच्या नशेत महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.
First published on: 24-04-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policemen arrested who molestation of woman constable