आज नांदेडमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. मात्र, या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या भेटीनंतर आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – ठाकरे बंधूंमध्ये समेट? शर्मिला ठाकरेंचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या….
“अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ”अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शाखाली मी अनेक वर्ष कामं केलं आहे. आजही मी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. आमच्यात कोणतीही कटूता नाही, कटूता असती मी त्यांची भेट घेतली नसती”, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर पुन्हा टीका; म्हणाले, “गद्दारांना…”
“राज्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी मुळे अनेक शेतकाऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याची पाहणी करण्यात करिता आले होते. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुल सत्तार आणि माझे वयक्तीक संबंध आहेत. आज ते सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. एक महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही ते म्हणाले.