हर्षद कशाळकर, अलिबाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल ते पेण दरम्यान मेमू रेल्वे शटल सेवेला रविवार पासून प्रारंभ झाला. त्यामुळे विस्तारीत उपनगरीय रेल्वे वाहतुकीचे जाळे पेण पर्यंत विस्तारले आहे. तर दुसरीकडे अलिबागकरांचे रेल्वे सेवेच स्वप्न मात्र तीन दशकांपासून अपुर्ण आहे. राजकीय उदासिनतेमुळे अलिबागच्या रेल्वेसेवा अद्यापही सुरु होऊ शकलेली नाही.

अलिबाग ते पेण दरम्याने रेल्वे मार्ग टाकण्याची मागणी गेली तीन दशक केली जात आहे. सुरवातीच्या काळात कै. दत्ताजीराव खानविलकर यांनी या रेल्वेसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यात फारसे यश आले नाही. अनंत गीते रायगडचे खासदार झाल्यानंतर त्यांनी या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न सुरु केले होते. तत्कालिन खासदारांची सुचना लक्षात घेऊन मध्यरेल्वेने या मार्गाचे सर्वेक्षण केले होते. अलिबाग वडखळ रस्त्यालगर २८ किलोमिटरचा नविन रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र त्यासाठी भुसंपादन करावे लागणार होते. या प्रकल्पासाठी जवळपास ३४० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दुसरया प्रस्तावात आरसीएफ कंपनीच्या विद्यमान रेल्वेमार्गाचा वापर करुन प्रवासी रेल्वे सेवा सुरु करण्याची शिफारस करण्यात आली होती. यामुळे प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाचणार होता. चोंढी येथे रेल्वे स्थानक बांधून हि प्रवासी रेल्वे सेवा सुरु करणे शक्य असल्याचे प्रस्तावात नमुद करण्यात आले होते. आरसीएफ व्यवस्थापनाने आपल्या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरु करण्यास हरकत नसल्याचे जाहीर केले होते. एमएमआरडीए आणि रेल्वे बोर्डाचा संयुक्त प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची उभारणी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र एमएमआरडीएने आयत्यावेळी या रेल्वे मार्गासाठी निधी देण्यास नकार दिल्याने प्रकल्पाबाबत ठोस निर्णय झाला नव्हता.

केंद्रात आणि राज्यात भाजप सेना प्रणित सरकार आल्यानंतर आणि रायगडचे खासदार अनंत गीते यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर तीन दशकांचा हा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा होती. मात्र सहकारी केंद्रीय मंत्र्याच्या सुचनांकडे रेल्वे मंत्रालयाने दुर्लक्ष्य केल्याचे यावरून दिसून येत आहे. कोकणातील सुरेश प्रभु  हे काही काळ रेल्वे मंत्री पदावर कार्यरत होते. मात्र त्यांनी गीते यांच्या मागणीला फारसे गांभिर्याने घेतले नाही. नंतर त्यांचे रेल्वे मंत्रीपद गेल्याने अलिबागकरांच्या उरल्या सुरल्या आशा धुळीला मिळाल्या. आज गीते यांच्याकडून अलिबाग पेण रेल्वे सेवा लवकरच सुरु होईल असे वांरवार सांगीतले जात असले तरी गेल्या चार वर्षांत याबाबत काहीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही हि वस्तुस्थिती आहे

दुसरीकडे शेकापनेही हि रेल्वेसेवा सुरु व्हावी यासाठी कधी प्रयत्न केले नाही, किंबहून हि रेल्वे सेवा सुरु व्हावी अशी इच्छाही त्यांच्या दिसून येत नाही. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी आपले राजकीय वजन पणाला लावून धरमतर येथील आपल्या पिएनपी जेटीवर रेल्वे जोडणी करून घेतली, मात्र याच वेळी अलिबाग पेण रेल्वे प्रवासी सेवा सुरु व्हावी यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाही. काँग्रेसनेही कागदी बाण चालवण्यापलीकडे अलिबागच्या रेल्वे सेवेसाठी काहीच केलेले नाही. एकुणच राजकीय पक्षांच्या उदासिनतेमुळे अलिबाग पेण रेल्वेचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हिच परीस्थिती कायम राहीली तर नजिकच्या काळात हा प्रश्न निकाली निघू शकरणार नाही.