“नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत”, असा गंभीर दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी केला आहे. ते नागपुरातील आरएसएसच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यांनी यावेळी राजकीय शिष्टाचारावरूनही भाष्य केलं. तसंच देशातील विविध मुद्द्यांवरही ते बोलेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन भागवत म्हणाले, “एक खरा सेवक काम करताना शिष्टाचार राखतो. शिष्टाचार राखताना तो अविचल राहतो. मी हे केले असा कोणताही श्रेयवाद करत नाही. सेवक कधीच अहंकार दाखवत नाही. तो नेहमी शिष्टाचार पाळतो. फक्त अशा व्यक्तीलाच सेवक म्हणण्याचा अधिकार आहे”, असं मोहन भगावत म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मोहन भागवत म्हणाले, निवडणुकीचे राजकारण ही स्पर्धा आहे, युद्ध नाही. निवडणूक ही लोकशाहीची अत्यावश्यक प्रक्रिया आहे, त्यात दोन पक्ष असतात, त्यामुळे स्पर्धा असते, स्पर्धा असेल तर एकाला पुढे नेण्याचे आणि दुसऱ्याला मागे ढकलण्याचे काम असते. त्याचा वापर करू नका, लोक का निवडून येतात? सहमती निर्माण करून देश चालवण्याची आमची परंपरा आहे, त्यामुळे एकसारखे मत असणे शक्य नाही. पण जेव्हा समाजातील लोक वेगवेगळी विचारसरणी असूनही एकत्र येण्याचा निर्णय घेतात, तेव्हा परस्पर संमतीने संसदेत दोन पक्ष असतात त्यामुळे दोन्ही बाजू समोर येतात, स्पर्धेत उतरलेल्या लोकांमध्ये एकमत होणे थोडे कठीण असते. त्यामुळेच आम्ही बहुमताची आशा बाळगतो, स्पर्धा आहे, परस्पर युद्ध नाही”, असं भागवतांनी पुढे स्पष्ट केलं. तसंच, आरएसएसला निवडणुकीत खेचले गेल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला, “वर्षभरापासून मणिपूर जळतं आहे, त्याकडे…”

प्रचारादरम्यान द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला

“टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन गोष्टी मांडल्या गेल्या. विद्येचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करायचा असतो. मात्र या आधुनिक तंत्राचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. निवडणूक लढताना एक प्रकारची मर्यादा असते. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवं”, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.”

ते म्हणाले, “निवडणूक लढवतानाही शिष्टाचार पाळला गेला नाही. आपल्या देशापुढील आव्हाने संपलेली नाहीत म्हणून शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे.” अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political parties did not follow etiquette in elections true servant direct statement of rss chief mohan bhagwat sgk
Show comments