Pooja Khedkar Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तुवणूक आणि अवाजवी मागण्यांमुळे चर्चे असलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विविध सुरस कथा सातत्याने समोर येत आहेत. त्यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला असून त्याखाली पूजा खेडकर यांना प्रचंड ट्रोल केलं जातंय. आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी त्या रुजू होणार असल्याचं त्यांनी आज सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना आज पत्रकारांनी घेरलं. तुम्ही वाशिम येथे केव्हापासून रुजू होणार आणि ओबीसी जातप्रमाणपत्राबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर पूजा खेडकर म्हणाल्या, “मी आज वाशिम येथे रुजू होणार आहे. येथे काम करायला मी इच्छूक आहे. परंतु, झाल्या प्रकाराबाबत मी अधिकृतरित्या काहीही सांगू शकत नाही. सॉरी मी याबाबत काहीच बोलू शकत नाही.”

पूजा खेडकर प्रकरण काय आहे? (What is Pooja Khedkar Case)

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. मात्र, आता फक्त बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे.

More Rear on Pooja Khedkar >> Pooja Khedkar : आई-वडील विभक्त, तर ‘या’ विषयांत अभ्यास संशोधन; पूजा खेडकर यांच्या मॉक इंटरव्ह्यूमधून अनेक खुलासे, VIDEO व्हायरल!

पूजा खेडकर यांनी आधी काही प्रमाणात अपंगत्वाच्या श्रेणीत अर्ज केला होता. नंतर पूर्ण अपंग श्रेणीमध्ये त्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला. निवड झाल्यानंतर मात्र यासाठीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सहा वेळा बोलवूनही Pooja Khedkar दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांमध्ये दिसून आलेल्या घोळामुळे आता त्यांना नोकरीतून बडतर्फ का करण्यात आलं नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर दिल्लीहून पावलं उचलली जाऊ लागली आहेत.

हेही वाचा >> IAS Pooja Khedkar यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!

पंतप्रधान कार्यालयानं मागितला अहवाल

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यसंदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचं गैरवर्तन या पार्श्वभूमीवर त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयानं पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja khedkar first reaction on her controversial behaviour sgk
Show comments