गेल्या काही दिवसांपासून IAS पूजा खेडकर चर्चेत आहेत. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र केबिन, गाडीवर अंबर दिवा आणि स्वीय सहाय्यक अशा मागण्यांसाठी केलेल्या गैरवर्तनानंतर आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी सादर केलेल्या ओबीसी प्रमाणपत्रांच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात आता सविस्तर चौकशी केली जात असतानात आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर याही चर्चेत आल्या आहेत. मनेरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्या गावातील काही शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय आहे व्हिडीओमध्ये?
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर आरेरावी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील महिला IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर असल्याचंच सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये त्या एका गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.
इथे पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेला कथित व्हिडीओ
नेमका काय आहे प्रकार?
हा व्हिडीओ मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांना धमकावत आहे. त्यांच्या बाजूला त्यांचे अंगरक्षकही दिसत आहेत. काही शेतकरी “हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही असं करू शकत नाहीत”, असं सांगताना ऐकू येत आहेत. पण त्याचवेळी “मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे”, असं त्या गावकऱ्यांना सांगत आहेत.
धडवली गावात खेडकर कुटुंबाने २५ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला होता, असं सांगितलं जात आहे. या वादावेळी त्या गावात बाऊन्सर घेऊन गेल्या व त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावल्याचंही बोललं जात आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही तक्रार मात्र नोंदवली गेली नसल्याचं सांगितलं जात आहे.
नेमका काय आहे IAS पूजा खेडकर यांच्याबाबतचा वाद
पूजा खेडकर या २०२३ साली IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना बुलढाण्याला पहिलं ट्रेनी पोस्टिंग मिळालं. पण त्या तिथे जॉईन झाल्या नाहीत. नंतर त्यांना पुण्यात ट्रेनी पोस्टिंग मिळालं. पण तिथे जॉईन व्हायच्या आधीच त्यांनी स्वतंत्र केबिन, स्वीय सहाय्यक अशा मागण्या केल्या. पुण्यातील सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचं केबिनही त्यांनी जबरदस्तीने घेतलं. यावरून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. पण आता त्यांनी IAS मध्ये निवड होताना ओबीसीची चुकीची कागदपत्र सादर केल्याचं समोर आलं आहे. त्यासंदर्भात आता सविस्तर चौकशी चालू आहे.