पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन गौप्यस्फोट होत आहेत. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता पूजाच्या कुटुंबातील वाद उफाळला आहे. पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

“संजय राठोडवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही”

बीड जिल्ह्यातील परळी येथे आज (मंगळवार) पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तर, ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप फेटाळत शांताबाईने बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोण काय बोलतंय ते माहीत नाही. आम्ही आमच्या दुःखात आहे. इतकंच नाही तर शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत, असा दावाही लहू चव्हाण यांनी केला आहे.

“बदनामी थांबली नाही तर आम्हाला आत्महत्याच करावी लागेल”, पूजा चव्हाणच्या वडिलांचा इशारा!

तर, शिवसेना नेते संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचचे तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे तिचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. एवढंच नाही तर मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी देखील शांताबाई राठोड यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आता लहू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुन्हा खळबळ उडाली आहे.

Story img Loader