काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. भाजपा, मनसे तसेच इतर पक्षांनी राहुल गांधींविरोधात आंदोलन केले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या याच टीकेवर भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांचे नाव गांधी नव्हे तर ‘राहुल गंदगी’ असे हवे होते, अशी टीका पूनम महाजन यांनी केली. त्या एका सभेला संबोधित करत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: कुर्ल्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

“स्वातंत्र्यवीर सावरकर असुदेत किंवा पंडित नेहरू असूदेत आम्ही कधीही कोणाविरोधात बोलत नाहीत. मात्र राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यांचे नाव राहुल गांधी नव्हे तर राहुल गंदगी असायला हवे. महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याबद्दल बोलतात,” असे पूनम महाजन म्हणाल्या.

हेही वाचा >>> नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल

पूमन महाजन यांनी उद्धव ठाकरे गटावरदेखील टीका केली. “जे आम्ही हिंदूत्ववादी आहोत असे म्हणतात तेदेखील शांत बसलेले आहेत. हीच तुमची विचारधारा आहे का? आम्ही देशहितासाठी पीडीपीला धुडकावून लावलं. आता शिवसेना आपल्या विचारधारेसाठी काँग्रेसला धुडकावून लावणार का?” असा सवाल पूनम महाजन यांनी केला आहे.

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल, म्हणाले…

दुसरीकडे पूनम महाजन यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “भाजपाच्या महिला खासदाराने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. मात्र खरी गंदगी हे केंद्र सरकार आहे. सरकार तिजोरी लुटत आहे. केंद्र सरकार देश विकत आहे. केंद्रातील सरकार देशातील गंदगी आहे. भाजपाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, असे भाजपाला वाटत आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam mahajan criticizes rahul gandhi uddhav thackeray on veer savarkar comment nana patole replied prd