अलिबाग : अलिबाग शहराला जोडणाऱ्या वडखळ अलिबाग महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतुक कोंडी समस्याही निर्माण होत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय आणि पर्यटन स्थळ असल्याने अलिबागला दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. या शिवाय धरमतर येथील जेएसडब्ल्यू प्रकल्प, पिएनपी पोर्ट मधून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे रस्त्यावरून हजारो वाहने ये जा करत असतात. पण सध्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. धरमतर येथील पिएनपी पोर्ट समोरील परिसरात आणि धरमतर चेक पोस्ट ते वडखळ परिसरात रस्त्याला भरमसाठ खड्डे पडले आहेत.

त्यामुळे पोयनाड ते वडखळ १० ते १५ मिनटाचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एकतासाचा कालावधी लागत आहे. खड्ड्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहनचालकांना आणि प्रवाश्यांना खड्ड्यातून आदळत आपटत वाट काढत प्रवास करावा लागत आहे.वडखळ ते अलिबाग हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या महामार्गाला १६६ ए क्रमांकही देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून या महामार्गाचे चौपदरीकरणही करण्यात येणार होते. मात्र अलिबाग विरार कॉरीडोर प्रस्तावित असल्याने या प्रस्ताव बारगळण्यात आला आहे. हा प्रस्ताव बारगळल्यानंतर रस्त्याची देखभाल दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहनकरावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
मुख्यमंत्री येती शहरा, आधी रस्ते दुरुस्त करा; अंबरनाथमधील खड्ड्यांपासून खाचखळगे तातडीने दुरुस्ती
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हेही वाचा : संजय राऊतांना दिलासा नाहीच! ; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवस वाढला

रस्त्याच्या दुरावस्थेची कारणे…

महामार्गालगत धरमतर परीसरात मोठ्या प्रमाणात दुतर्फा भराव करण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. हे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता खचणे, उखडणे यासारखे प्रकार होत आहे. जेएसडब्ल्यू कंपनीतून लोखंडी कॉईल्सची, तर पिएनपी पोर्ट कंपनीतून कोळसा आणि कच्चे लोखंड यांची वाहतुक केली जाते. ट्रक आणि ट्रेलरच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक सर्रास सुरु असते. उसरयेथील एचपिसीएस कंपनीचे गॅस कॅप्सूल याच मार्गावरून जातात. त्यामुळेही रस्त्या नादुरुस्त होतो.

हेही वाचा : ऊस लागवडीत वाढ, १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामास सुरूवात; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

महामार्ग प्राधिकरणाची उदासिनता

रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द झाल्याने महामार्ग प्राधिकरणाचा या रस्त्याबाबतचा दृष्टीकोनच बदलला आहे. हा महामार्ग पुन्हा एकदा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे खाजगी बंदरे यांना जोडणाऱ्या मार्गांची रुंदीकरण करून त्यांची देखभाल करण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. मात्र तरीही गेल्या २० वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या अलिबाग विरार कॉरीडोर मार्गाचे कारण पुढे करून या मार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

महामार्गावर चालणारी अवजड वाहतुक आणि दुतर्फा झालेले भराव यामुळे रस्त्याची वाताहत होत आहे. दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाला या परिस्थितीचे गांभिर्य राहीलेले नाही. १५ ऑगस्ट रोजी मी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते. दुरुस्तीकरतो म्हणून आश्वासने दिली. दुरुस्ती केली नाही. जेएडब्लू कंपनीने सिएसआर फंडातून वडखळ पर्यंत रस्ता करण्याचे मान्य केले आहे. पण धरमतर पोलीस चौकीच्या पुढचा रस्ता त्यांनी केलेला नाही.- दिलीप जोग खड्डे अँक्टीव्हीस्ट

या मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांचे खड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. पण महामार्ग प्राधिकरण रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. आठ दिवसात रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. – प्रविण ठाकूर, काँग्रेस नेते.