Pune Porsche Crash Latest Updates :पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांनाही उडवलं. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. ताशी १६० किमीच्या वेगात हा अल्पवयीन मुलगा पोर्श कार चालवत होता. १९ मेच्या पहाटे ही घटना घडली. या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या प्रकरणात सुरुवातीला मुलाला जामीन मिळाला होता. मात्र या घटनेबाबत रोष व्यक्त झाल्यानंतर या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली. तसंच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांच्या नावे असलेलं हॉटेल बुलडोझर चालवून पाडण्यात आलं आहे. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी याबाबत पोस्ट केली आहे.

१९ मेच्या पहाटे काय झालं?

पुण्यात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र १५ तासांत त्याला जामीन मिळाला. १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त झाला. १९ तारखेपासून या घटनेवर विविध पडसाद उमटत आहेत. समाजात हा विषय चर्चिला जातो आहे. अशात या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकीय आरोप होत आहेत. आता या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांचं महाबळेश्वर येथील हॉटेल पाडण्यात आलं आहे.

Porsche Accident: “माझ्या मुलीच्या मृत्यूला १२ दिवस झाले आहेत, आता…”; अश्विनीच्या आईचा सून्न करणारा सवाल

रवींद्र धंगेकरांची पोस्ट काय?

उशिरा आलेले शहाणपण.. पुण्यातील कल्याणीनगर दुर्घटनेतील आरोपी मुलाचा आजोबा सुरेंद्र अगरवालचे महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आज हे प्रकरण प्रकाश झोतात आल्यावर प्रशासन कारवाई करत आहे, याचा अर्थ इतके दिवस हे सगळं माहीत असूनही प्रशासन गप्प होते. अगरवालचे अनेक अवैध धंदे, हत्या, फसवणुक, दमदाटी केल्याची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांनी पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

पुण्यात १९ तारखेला एका पोर्श कार चालवणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतल्या अल्पवयीन मुलाने दोघांना उडवलं. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया अशी मृतांची नावं आहेत. या दोघांना उडवल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. पण त्यानंतर १५ तासांमध्ये जामीन मिळाला. ज्यामुळे सोशल मीडिया आणि पुण्यात चांगलाच संताप झालेला पाहण्यास मिळाला. त्यानंतर या अपघाताबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. आता अल्पवयीन मुलाच्या आजोबांच्या हॉटेलवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.