सावंतवाडी: शिवजयंतीचे औचित्य साधून मालवण येथील वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी विजेच्या बल्ब मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्तवेधक चित्र साकारले आहे. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हे चित्र साकारण्यात श्री चांदरकर हे यशस्वी झाले आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साडेतीनशे वर्षाच्या पारतंत्र्याच्या अंध:कारात खितपत पडलेल्या रयतेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करत स्वातंत्र्याची पहाट दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आजही सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत.

विजेचा बल्ब जसा प्रकाश देतो तसेच शिवरायांचे कार्य आणि विचार आजही समाजाला प्रकाशमान करतात. याच धर्तीवर कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी बल्बच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. यासाठी त्यांनी बल्बच्या वरून छेद केला. सरळ ब्रशने रंगकाम करणे शक्य नसल्यामुळे ब्रशला काटकोनात वळवून ऍक्रेलिक रंगांच्या सहाय्याने ही प्रतिमा साकारली. यासाठी तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. अशी नाविन्यपूर्ण  साकारलेली महाराजांची महाराष्ट्रातील बहुदा ही पहिलीच कलाकृती  आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण कलाकृतीसाठी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होते आहे.