नाशिक रोड येथे खरेदी केलेल्या जमिनीचा ताबा गायक सुरेश वाडकर यांच्याकडे देण्याचे आदेश नाशिकमधील अतिरिक जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी दिले. या निर्णयामुळे सुरेश वाडकर यांना दिलासा मिळाला आहे.
ही कशाची ओढ?
वाडकर यांनी काही वर्षांपूर्वी नाशिक रोड येथे जमीन खरेदी केली होती. या व्यवहाराची कागदपत्रे तपासल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी महसूल विभागाकडे याचिकाही दाखल केली. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली आणि जमिनीचा ताबा वाडकरांकडे देण्याचे आदेश देण्यात आले. संगीत शाळा सुरू करण्यासाठी वाडकर यांनी ही जमीन खरेदी केली होती. तिचा ताबा मिळण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी वाडकर यांनी उद्विग्नपणे यापेक्षा परदेशात जाऊन राहणे चांगले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
नाशिकमधील ‘त्या’ वादग्रस्त जमिनीचा ताबा सुरेश वाडकरांकडे देण्याचे आदेश
नाशिक रोड येथे खरेदी केलेल्या जमिनीचा ताबा गायक सुरेश वाडकर यांच्याकडे देण्याचे आदेश नाशिकमधील अतिरिक जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी दिले.

First published on: 08-10-2013 at 03:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possession of nashik road land should be given to suresh wadkar