नाशिक रोड येथे खरेदी केलेल्या जमिनीचा ताबा गायक सुरेश वाडकर यांच्याकडे देण्याचे आदेश नाशिकमधील अतिरिक जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी दिले. या निर्णयामुळे सुरेश वाडकर यांना दिलासा मिळाला आहे. 
ही कशाची ओढ?
वाडकर यांनी काही वर्षांपूर्वी नाशिक रोड येथे जमीन खरेदी केली होती. या व्यवहाराची कागदपत्रे तपासल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी महसूल विभागाकडे याचिकाही दाखल केली. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली आणि जमिनीचा ताबा वाडकरांकडे देण्याचे आदेश देण्यात आले. संगीत शाळा सुरू करण्यासाठी वाडकर यांनी ही जमीन खरेदी केली होती. तिचा ताबा मिळण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी वाडकर यांनी उद्विग्नपणे यापेक्षा परदेशात जाऊन राहणे चांगले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा