राज्यात या वर्षी चौदा लाख हेक्टरवर गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात आíथक नुकसान झाले असून, आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. राज्यात ८० ते ९० टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामेही युद्धपातळीवर करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
विखे यांनी आज िपप्री निर्मळ, राजुरी, नांदुर या भागातील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. या वेळी राहाता पं.स.चे सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, सदस्या सुरेखा इनामके, एन. टी. निर्मळ, ज्ञानदेव घोरपडे, प्रकाश गोरे, वैभव कदम, दिलीप गोरे आदी उपस्थित होते.
राज्यात आठ वर्षांपूर्वी सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र गारपिटीने बाधित झाले होते. या वर्षी मात्र राज्यात चौदा लाख हेक्टर क्षेत्र गारपिटीने बाधित झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता मंत्री विखे यांनी व्यक्त केली. राज्यात फळबागांबरोबरच गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचेही नुकसान झाले आहे. राज्यातील आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने पाच हजार कोटींचा प्रस्ताव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे दिला आहे. सदर मदत शेतकऱ्यांना लवकरच मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शेतकरी दुष्काळातून बाहेर पडला असतानाच अचानक अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याने त्यांना सावरण्याचे काम करावे लागणार आहे असे सांगून विखे म्हणाले, पिकांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसíगक संकटाचा मुकाबला शेतकरी करीत आहे. त्यांना आधार देण्याचे काम सहकारी व खासगी साखर कारखान्यांबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी करावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा