साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील नांदुर्डी येथील सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असताना शुक्रवारी अनेक तास गडावर वीज पुरवठा खंडित झाल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले.
सप्तशृंग गडावरील देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात लाखो भाविकांची गर्दी होत असते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या कालावधीत गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी करण्यात येते. मंदिर परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे लावले जातात. या कालावधीत सदैव वीज पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जाते. यंदाही प्रशासन आणि मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने जय्यत तयारी असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशीच प्रशासनाचा हा दावा किती फोल आहे, हे दिसून आले. शुक्रवारी दुपारी गडावरील वीज पुरवठा खंडित झाला. वीज गायब असल्याने प्रशासकीय तयारीवर त्याचा परिणाम झाला. त्यातच विश्वस्त मंडळाचे इन्व्हर्टर बंद, जनरेटर नादुरूस्त अशी स्थिती. उत्सव काळात जर वीज वारंवार गायब होऊ लागली तर सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी लावण्यात येणारे सीसी टीव्ही कॅमेरे कसे कार्यान्वित होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सप्तशृंग गडावर अनेक तास वीज गायब
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील नांदुर्डी येथील सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आल्याचा दावा
First published on: 05-10-2013 at 04:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power disappeared for several hours on saptashrungi fort