अरविंद केजरीवाल यांना समाज आणि देशापेक्षा सत्ता अधिक महत्वाची वाटू लागली असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. नागपूरमध्ये पत्रकारपरिषदेत अण्णा बोलत होते.
अण्णा म्हणाले, अरविंद केजरीवालांना जनलोकपाल इतकंच महत्वाचं वाटत होते तर, त्यांनी सत्तेत राहून मंजूर करूनच घ्यायला हवे होते. त्यात काही घटनात्मक कमतरता होती मग, ते सर्वांनी एकत्रित चर्चा करून मंजूर करण्याची आवश्यकता होती. परंतु, तसे काही करण्याचे प्रयत्न केजरीवाल यांनी केले नाहीत. त्यामुळे देश आणि समाजापेक्षा केजरीवालांना सत्ता महत्वाची वाटू लागली आहे. असे मला वाटते. असेही अण्णा म्हणाले. अरविंद केजरीवालांनी आपल्या वागण्यात बदल करायला हवा असा गुरूमंत्रही अण्णांनी केजरीवालांना देऊ केला आहे.
जनलोकपाल विधेयक मंजून न होण्याच्या कारणावरून अरविंद केजरीवालांच्या ‘आप’सरकारने पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. यावर केजरीवालांच्या या निर्णयावर टीका-प्रतिटीका सुरू आहेत. त्यात अण्णांना आपल्या गुरूस्थानी मानत असलेल्या केजरीवालांवर  टीका करून अण्णांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला मार्ग निर्माण करून दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा