लातूर जिल्हा सहकारी बँकेवर अनभिषिक्त साम्राज्य गाजवणाऱ्या देशमुख गटाला हादरे देत भाजपचे रमेश कराड व धर्मपाल देवशेट्टे यांनी विजय मिळवला. चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.
बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत १९ पकी विलासराव देशमुख सहकारी पॅनेलचे तब्बल १३ संचालक बिनविरोध निवडून आले. सहा जागांसाठी ४०५ मतदारांपकी ४०४ जणांनी मतदान केले. चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी होऊन तासाभरातच सर्व निकाल जाहीर झाले. नागरी पतसंस्था मतदारसंघातून भाजपचे रमेशअप्पा कराड यांनी विलासराव देशमुख पॅनेलचे अशोक गोिवदपूरकर यांच्यावर २५ मतांनी मात केली. जळकोट मतदारसंघात भाजपचे धर्मपाल देवशेट्टे यांनी काँग्रेसच्या शीला पाटील यांचा ४ मतांनी पराभव केला. अहमदपूर मतदारसंघात विलासराव देशमुख सहकारी पॅनेलचे बाबासाहेब पाटील, चाकूरमधून नागनाथ पाटील, देवणीमधून भगवान पाटील विजयनगरकर व शिरूर अनंतपाळमधून व्यंकटराव बिरादार विजयी झाले. १९ पकी १७ जागांवर सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला. मात्र, प्रतिष्ठेच्या नागरी पतसंस्था मतदारसंघासाठी आमदार दिलीपराव देशमुख यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपच्या रमेशअप्पा कराड यांनी त्यांच्यावर मात केली.
यापूर्वी या ना त्या कारणाने रमेश कराड यांना विविध निवडणुकांत पराभव पत्करावा लागला होता. बँकेत मात्र कराड यांनी विजय प्राप्त केल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जळकोटमध्ये बँकेच्या माजी अध्यक्ष शीला पाटील यांचा धक्कादायक पराभव झाल्यामुळे सत्ताधारी गटात चिंतेचे वातावरण पसरले. या मतदारसंघातही भाजपचे धर्मपाल देवशेट्टे विजयी झाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधक पूर्णपणे विस्कळीत, तर सत्ताधारी गट अतिशय नियोजनपूर्वक िरगणात उतरला होता. मांजरा, रेणा, विकास या तीन सहकारी साखर कारखान्यांमध्ये ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक मते मिळाला. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत होईल व सर्व जागांवर सत्ताधारी मंडळी विजयी होतील, असा जाणकारांचा अंदाज होता. मात्र, रमेशअप्पा कराड व धर्मपाल देवशेट्टे यांनी हा अंदाज खोटा ठरवत देशमुखांच्या साम्राज्याला चांगलाच हादरा दिला.

Story img Loader