ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी विदर्भ साहित्य संघामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याचे संघाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघामार्फत आजच त्यांनी त्यांचा अर्ज अग्रेशित केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे यांची स्वाक्षरी असल्याचे सूत्रांनी सांगितले.  उमेदवार ज्या भागात राहतो त्या भागातील महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत अर्ज भरत असतो. त्या नियमानुसार वैदर्भीय प्रभा गणोरकरांनी त्यांचा अर्ज विदर्भ साहित्य संघातून भरला आहे. त्यांच्या अर्जावरील सूचक आणि अनुमोदक विदर्भ साहित्य संघाचे सदस्य आहेत किंवा नाही, याची शहानिशा केल्यानंतरच संघ योग्य कार्यवाहीसाठी अर्ज पुढे पाठवेल.

Story img Loader