प्रदीप लोखंडे हे ‘रुरल रिलेशन्स’ या संस्थेचे संस्थापक आहेत. मूळचे वाईचे असलेले प्रदीप लोखंडे यांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून भारतातील ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तन घडवलं आहे. १९९५ साली व्यावसायिक दृष्टीकोनातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पुढे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वळला. प्रदीप लोखंडे यांच्या मदतीने आतापर्यंत देशभरातील ग्रामीण भागांत ५८०० ग्रंथालयं सुरू झाली आहेत. त्यापैकी साडेचार हजार ग्रंथायलयं ही महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शाळेत संगणकही पुरवण्यात आले आहेत. यासाठी प्रदीप लोखंडे लोकांना नवीन किंवा वापरलेली पुस्तकं देण्याचं आवाहन करतात. ही पुस्तकं गोळा करून ते महाराष्ट्र आणि देशातील ग्रामीण भागांत पुरवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यातूनच ‘ग्यान की’ या पुस्तक चळवळीची सुरुवात झाली. पोस्टकार्डच्या माध्यमातून त्यांनी खेडे गावांशी संपर्क साधला. गावातील शिक्षक, सरपंच, आठवडी बाजार, शाळा, गावातील सुविधा अशी सर्व माहिती ते पत्राद्वारे विचारायचे. सुरुवातील त्यांना अपयश आलं. मात्र कालांतराने गाव-खेड्यांतून त्यांना प्रतिसाद मिळू लागला. आता हा प्रतिसाद साडे आठ लाख पत्रांपर्यंत पोहोचला आहे. पत्राद्वारे ४९ हजार गावांशी त्यांचा संपर्क झाला असून ५८०० गावांना त्यांनी स्वतः भेट दिली आहे. पोस्टकार्डच्या माध्यमातून गावांशी संपर्क साधतानाचा त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradeep lokhande known as postcard man who connect rural india through post cards pck