महाराष्ट्राच्या राजकारणात तीन महिन्यांपूर्वी मोठा स्फोट झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून पक्षाचे दोन गट तयार झाले. अजित पवारांनी पक्षात बंडखोरी करत काही आमदार खासदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत असा दावा करत भाजपाशी हातमिळवणी केली. आता अजित पवारांचा गट भाजपा आणि शिंदे गटाबरोबर राज्याच्या सत्तेत बसला आहे. तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. दरम्यान, पक्षात फूट पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट म्हणजेच शरद पवार गट अजित पवार आणि त्यांच्या बंडखोर सहकाऱ्यांवर टीका करत आहे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की आम्ही सत्तेत आल्यावर अजित पवारांना तुरुंगात टाकू, त्यांना चक्की पिसायला लावू (पीठ दळायला लावू). यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी अलिकडेच भाष्य केलं होतं. सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी भाजपाने माफी मागावी असं वक्तव्य केलं होतं. यावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल गुरुवारी (५ सप्टेंबर) इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमचे नेते शरद पवार यांच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त उलट-सुलट टीका, आरोप कोणी केले? शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका कोणी केली? अशी टीका बाळासाहेब ठाकरे (शिवसेनाप्रमुख) आणि उद्धव ठाकरे यांनी केली. तरीदेखील आम्ही त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलंच ना. सगळेजण विचारसरणीबद्दल बोलतायत, परंतु, शिवसेना आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आमच्यावर सर्वाधिक टीका कोणी केली, आम्हाला राजकारणात सर्वाधिक ज्यांनी सुनावलं आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत बसलो. आम्ही त्यांच्याबरोबर का गेलो तर तिकडे सत्ता आहे म्हणूनच गेलो.

प्रफुल्ल पटेल यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांना विचारण्यात आलं की, मग देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेली टीका, चक्की पिसायला लावू असं केलेलं वक्तव्य तुम्ही विसरलात का? राजकारणात या सगळ्या गोष्टी माफ होतात का? यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या वेळी सगळं विसरलोच होतो ना.

माजी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, आज मी तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आमच्या आणि शिवसेनेच्या विधानसभेच्या जागा जवळपास सारख्याच होत्या. मला आठवतंय, मी शरद पवारांना बोललो, मी त्यांना विनंती केली, आपण त्यांच्याबरोबर सरकार बनवतोय, त्या दिशेने आपण पुढे गेलो आहोत. परंतु, त्यांच्याकडे ५६ आमदार आहेत आणि आपल्याकडे ५४ आमदार आहेत. तर सत्तेतील अर्धा काळ (अडीच वर्ष) आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. आपल्या आणि शिवसेनेच्या आकड्यांमध्ये फार मोठा फरक नाही.

हे ही वाचा >> आंदोलन गुंडाळण्यासाठी ५० खोक्यांची ऑफर? मॅनेज होण्याबद्दल मनोज जरांगे स्पष्टच बोलले

यावर पटेल यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं होतं का? त्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, हो, आम्हाला सत्तेच्या अर्ध्या कार्यकाळा मुख्यमंत्रीपद हवं होतं. मी तसं शरद पवारांना बोललो. त्यावर शरद पवारांनीच मला सांगितलं की तुम्ही जा आणि त्यांच्याशी (उद्धव ठाकरे) बोलून घ्या. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. आदित्य ठाकरेदेखील तिथेच बसले होते. मी उद्धव ठाकरेंना म्हणालो, आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्या. त्यावर उद्धव आणि आदित्य ठाकरे काहीच बोलले नाहीत.

Story img Loader