विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये पुरस्कार मिळविलेले येथील चित्रकार प्रा. प्रफुल्ल सावंत यांचे ‘ड्रीम्स ऑफ हॉरायझन’ या चित्रमालिकेचे प्रदर्शन २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मुंबई येथील जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
अभिनेते मिलिंद गुणाजी तसेच अर्थक्षेत्रातील दिग्गज मोतीलाल ओसवाल, रुणवाल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष रुणवाल, अशोका बिल्डकॉनचे अध्यक्ष अशोक कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत जहांगीर कलादालनातील प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. दिवंगत ज्येष्ठ चित्रकार नाशिक येथील शिवाजी तुपे यांना हे चित्रप्रदर्शन चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी समर्पित केले आहे.
सावंत यांची अनेक चित्र प्रदर्शने देश व परदेशात गाजली आहेत. आतापर्यंत राज्य ते राष्ट्रीय असे एकूण ४० पुरस्कार तसेच सहा नामांकित कला शिष्यवृत्ती त्यांना मिळाल्या आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षांच्या आतच जागतिक पातळीवरील चित्रकला क्षेत्रातील नामांकित कलासंस्थांचे एकूण १६ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यात २०११ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील साऊथवेस्ट आर्ट, ह्युस्टन येथील वॉटर कलर आर्ट सोसायटी, जर्मनीतील लिपझिंग पाल्म आर्ट, अमेरिकेतील सॅन्डीएगो वॉटर कलर सोसायटी (२०१०), न्यूयॉर्क येथील आर्ट रिनिव्हल सेंटर (२०१०), तुर्कस्तानातील इस्तांबूल वॉटर कलर सोसायटी (२०१२), ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील केंबरवेल रॉयल आर्ट शो (२०१३) या संस्थांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना भारतातील सवरेत्कृष्ट एकाच चित्रकारास दिली जाणारी कलाक्षेत्रातील अत्यंत मानाची बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे दिली जाणारी ‘बेंद्रे-हुसेन नॅशनल स्कॉलरशिप’ २००५ मध्ये तसेच कॅम्लीन आर्ट फाऊंडेशनच्या वतीने ‘युरोप आर्ट टूर नॅशनल स्कॉलरशिप’ २००६ साठी त्यांना मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा