राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांची लगबग सुरू आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विविध मतदारसंघात आपले दौरे वाढवले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका सुरु आहे. असे असताना महायुतीमध्ये सहभागी असलेले आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार की महायुतीत राहणार? यावर बच्चू कडू यांनी सूचक भाष्य केलं आहे. महायुतीत बच्चू कडू अस्वस्थ आहेत का? यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बच्चू कडू काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाची रणनीती काय आहे? या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले “९ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचं अधिवेशन आहे. अधिवेशन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयावर आमचं एक आंदोलन आहे. त्याचवेळी आम्ही आमचे मुद्दे सरकारसमोर ठेवणार आहोत. आमच्या मुद्द्यावर सहमत असतील तर त्याबाबत आम्ही विचार करणार आहोत”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : “…तर आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल”, अजित पवार गटातील आमदाराचा महायुतीला इशारा; म्हणाले…

विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार की महायुतीत लढणार? यावर बच्चू कडू यांनी सांगितलं, “आम्ही आमचे सर्व मुद्दे सर्वांसमोर ठेवणार आहोत. तेच प्रश्न सरकार समोरही ठेवले जातील. आमच्या मुद्यावर चर्चा झाली तर पुढचं पाऊल आम्ही टाकू. आमच्यासाठी पक्ष, जात, धर्म महत्वाचा नाही, तर जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. ९ तारखेला आम्ही दिव्यांगांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईतील घरकुलाचे प्रश्न यासह आदी मुद्दे समोर ठेवणार आहोत. एक लाख लोकांसमोर आम्ही आमचे मुद्दे ठेवणार आहोत. तेच मुद्दे सर्व पक्षांसमोरही ठेवणार आहोत. त्याला ज्यांची सहमती असेल त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ”, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

महायुतीत तुम्ही अस्वस्थ आहात का?

महायुतीमध्ये तुम्ही खूश आहात का की अस्वस्थ आहात? यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आम्ही खूश असण्याचं काही कारण नाही. मला वाटतं की आम्ही खूश राहण्यापेक्षा जनता खूश राहिल याचा आम्ही विचार करतो. आम्हाला कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नाही. सन्मानाची गरज नाही किंवा कोणत्या पदाची गरज नाही. आमच्या मुद्यासंदर्भात चर्चा व्हावी. सन्मान किंवा पद हा आमचा विषय नाही. आमच्या मुद्यासाठी जो विचार करेन त्यासाठी आम्ही पुढे येऊ”, असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं.