Prajakta Mali Press Conference: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत बीडचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. आमदार सुरेश धस यांनी बीडमधील इव्हेंट पॉलिटिक्स असं म्हणत धनंजय मुंडेंवर टीका केली. मात्र, त्यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यामुळे त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणावर आज मुंबईत प्राजक्ता माळीनं सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सुरेश धसांच्या एका निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं म्हणत त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी ठाम भूमिका प्राजक्ता माळीनं घेतली आहे.

“महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही”

“कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. परळीच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलं आहे. यापुढेही काम करत राहणार. याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाहीबरोबर असंच नाव जोडणार का? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. ते बोलले ते इतकं कुत्सित आहे. तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात. महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात”, अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं आपला संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
hansal mehta criticise laapta ladies oscar selection
निवड चुकली, ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यावर बॉलीवूड दिग्दर्शकाचं स्पष्ट मत; म्हणाले…
Deepti Naval recalls meeting Raj Kapoor
“राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला गेलेली मी एकमेव महिला…”, दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य
Devendra fadnavis opposition
“हव्या त्या विषयावर चर्चेसाठी तयार, विरोधकांनी उगाच राजकारण करू नये…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
devendra Fadnavis
Devendra Fadnavis : ओबीसींचा वापर करून घेतल्याच्या आरोपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये झालेल्या अन्यायाचा राग…”

प्राजक्ता माळीनं केली महिला आयोगाकडे तक्रार

“फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना फार सॉफ्ट टार्गेट केलं जातं. कुणीही यावं आणि नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्यातल्या राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांच्या नावांचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी मागावी. फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय, त्यांचीही त्यांनी माफी करावी. कोणत्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. मी त्यांनाही विनंती केली आहे की तुम्ही यावर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. मीही कायदेशीर कारवाई करत राहीन”, असं प्राजक्ता माळी म्हणाली.

“माझ्या आईला दीड महिना शांत झोप लागली नाही”

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही मी विनंती करते. या व्यक्ती दोन वाक्य बोलून गेल्या. पण प्रसारमाध्यमं त्यातूनच हजार व्हिडीओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे वादळ येऊ शकतं, त्यांचं करीअर बरबाद होऊ शकतं, त्या नैराश्यात जाऊ शकतात. त्या आत्महत्या करू शकतात. माझी आई काल रात्रभर झोपली नाही. दीड महिना तिला शांत झोप लागली असेल असं मला वाटत नाही. माझ्या भावानं सोशल मिडिया बंद केला. सगळे अकाऊंट्स डिलीट केले. या प्रकाराचा माझ्या कुटुंबावर वाईट परिणाम होतोय”, अशा उद्विग्न भावना प्राजक्ता माळीने यावेळी व्यक्त केल्या.

“समाजात फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एका मुलीची प्रतिमा अशा प्रकारे डागाळणं आणि त्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी”, असंही तिने नमूद केलं.

“आमचं क्षेत्र बदनाम नाहीये, ही मंडळी ते बदनाम करतायत”

“जर हजार कार्यक्रमांत हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर इथून पुढे कलाकार राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्या कार्यक्रमाला जातील का? तेही धजावणार नाहीत. पुढे कुणी कला क्षेत्रात मुलांना पाठवणार नाहीत. कलाक्षेत्र बदनाम नाही. ही सगळी मंडळी ते बदनाम करतात. आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो, पण तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता. स्वार्थासाठी वापरता. हे अत्यंत चुकीचं आहे. महिलांची नावं लगेच तोंडावर कशी येतात? पुरुषांची नावं कशी येत नाहीत?” असा सवालही प्राजक्ता माळीनं उपस्थित केला आहे.

Prajakta Mali: “महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही”, प्राजक्ता माळीचा सुरेश धसांच्या विधानावर संताप, पत्रकार परिषदेत झाले अश्रू अनावर!

काय म्हणाले होते सुरेश धस?

“विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते”, असं विधान त्यांनी केलं होतं. तसेच, “जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे”, असंही ते म्हणाले होते

Story img Loader