बाळासाहेबांभोवती (प्रकाश आंबेडकर) यांचा लोकांचा गराडा असायचा, मी जळगावला नोकरी करायचे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी त्यांची हटके लव्हस्टोरी सांगितली आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी आज प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी अंजली आंबेडकर यांनी ही बाब सांगितली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच संघर्ष तुमच्याही आयुष्यात आला का?

अंजली आंबेडकर : आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आलं याचं मला खूप समाधान आहे.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

महाराष्ट्राला आत्तापर्यंत महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. वंचित बहुजन आघाडीला सत्ता मिळाली तर चेहरा कुणाचा असेल?

अंजली आंबेडकर : ज्या दिवशी वंचित घटकातली महिला मुख्यमंत्री होईलल तो दिवस हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असेल.

तुमच्या लग्नाची गोष्ट काय?

बाळासाहेब : काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या.
अंजलीताई : काही मित्रांनी जमवूनआमचा प्रेमविवाह जमवून दिला. प्रकाश आंबेडकर आणि माझी पहिली भेट भारिपच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात झाली. तेंव्हाही बाळासाहेब फेमस होते. मग भेटायचं कुठे हा प्रश्न पडायचा? आम्ही अनेकदा ट्रेनमध्ये दोन-तीन स्टेशनमध्ये सोबत प्रवास करताना भेटायचो. मी त्या काळात जळगावला नोकरी करायचे. बाळासाहेब प्रचंड हळवे आहेत.

तुमच्या घरात भांडणं होतात का?

अंजली आंबेडकर : टुथपेस्टची कॅप का लावली नाही इथपासून ते वंचितच्या निर्णयापर्यंत अनेक विषयांवर आम्ही भांडतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असूनही इतकं साधं कसं वागता?

प्रकाश आंबेडकर : यासंदर्भात लोकांचा दृष्टीकोन बदलणं आवश्यक आहे. मी वेगळा आहे हे वाटणं हे कृत्रीम जगणं आहे.

सध्या दहशतीचे वातावरण असतांना एक व्यक्तीच बोलत असतो. कोणतीही सुरक्षा नसते.

प्रकाश आंबेडकर: तुमचं म्हणणं प्रामाणिक असेल. कोणता हेतू नसेल तर विरोधकही तुम्हाला स्वीकारतात. मी स्वायत्त. माझा राजा मीच. नियम पाळणं हे मला जगण्यापुरते बाकी माझा राजा मीच. आपण स्पष्ट असलो तर कुणाचीच भीती बाळगण्याची गरज नाही. कलबुर्गी, दाभोळकर त्यांना जे वाटतं ते मांडायचे. शेवटी कुणाला पटत नाही म्हणून मांडणं थांबवायचे का? शेवटी समाजात आपल्याला जे घडवावे वाटते ते घडवले पाहिजे. त्यासाठी किंमत मोजायलाही तयार असलं पाहिजे. त्यामुळे आपण लढत रहायचं हे ठरवलं.

राज्यसभेचा खासदार म्हणून संसदेची पहिली पायरी चढतांना मनात काय भावना होती?

प्रकाश आंबेडकर : मी जेव्हा संसदत पाऊल ठेवणार होतो, तेव्हा चालत गेलो. तेव्हा संसदेची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था होती. त्यांनी गेल्याबरोबर सुरक्षा रक्षकांनी स्वागत केल्यानं आवाक् झालो. एक इतिहास समोर न्यावा लागेल अशी भावना होती. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं.

संविधान योग्य लोकांच्या हाती आहे का?. सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं?

प्रकाश आंबेडकर : दोघांचाही कामाबद्दल खुश नाही. दोघांमधील रेष पुसट. ही रेष तडजोड झाल्यासारखं वाटतं.

संविधान धोक्यात आहे का?

प्रकाश आंबेडकर : १९५० मध्ये ज्या संघटनांनी संविधान मानत नाही, अशी भूमिका घेतली त्या संघटना आजही कार्यरत. त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं का? सरदार पटेलांनी जी भीती व्यक्त केली ती भीती आजही आहे.

एकत्र कुठला सिनेमा पाहिला?

अंजली आंबेडकर : एकत्र कुठला सिनेमा पाहिला ते आठवत नाही. मात्र आम्ही दोघांनी शर्मिला टागोरचा सिनेमा चुकवला नाही.