वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकींबाबत मोठा दावा केला आहे. विरोधकांना निवडणूक लढवण्यासाठी निधीच मिळू नये म्हणून भाजपाने नोटंबदीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच राजकीय पक्षांनी गाफील राहू नये, असा इशारा देत लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत केलं. ते शनिवारी (२० मे) अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भाजपाने कोंडीचं राजकारण सुरू केलं आहे. आरबीआयने घेतलेला दोन हजार रुपयांच्या नोटेबाबतचा निर्णय हा विरोधकांना निधीच मिळू नये यासाठी भाजपाने केलेला खेळ आहे. इथल्या राजकीय पक्षांनी गाफील राहू नये.”
“ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३ मध्येच लोकसभेच्या निवडणुका लागतील”
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकींबाबतही मोठं भाकीत केलं. इथल्या राजकीय पक्षांनी गाफील राहू नये. ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३ मध्येच लोकसभेच्या निवडणुका लागतीलच, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “मविआ फुटायला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…”; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
उद्धव ठाकरेंच्या महासभेला उपस्थित राहणार का या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ते उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे.