बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांनी जातीच्या प्रश्नांवर प्रथम भूमिका घ्यावी, असे खुले आव्हान भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
अस्पृश्यता निवारण करण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपूर्वी या संघटनांनी दिले होते. त्यांनी आधी जातीच्या प्रश्नांवर भूमिका घ्यावी. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन होईपर्यंत या संघटनांनी कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. जातीच्या प्रश्नांवर मौन न बाळगता आधी त्यांनी भूमिका मांडावी. जात आणि आरक्षण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. जात म्हणजे आपली ओळख बनली आहे. ती पुसून आपली भारतीय अशी ओळख बनायला हवी, असे सांगून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांचा निषेध केला.
देशातील बॉम्बस्फोटांमुळे हिंदू समाज व पोलीसही बोलायला लागले. हिंदू संघटनांमुळे आपण सुरक्षित आहोत, असेही त्यांना वाटायला लागल्याने नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मारेकऱ्यांचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. हिंसक कट्टरवादी संघटनांना त्यांचे वर्चस्व सिद्ध करायचे असल्याने विचारवंतांना संपल्यानंतर ते लोकशाहीमार्गे जाणाऱ्या धार्मिक संघटनांवर हल्ला करण्यासही कचरणार नाहीत. देशात सध्याची परिस्थिती अराजकतेची सुचक असल्याचे ते म्हणाले.
अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या संदर्भात जो काही लाँगमार्च काढणार आहेत, त्यास भारिप-बहुजन महासंघाचा पाठिंबा राहील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा