आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनी युती केली आहे. या युतीच्या माध्यमातून राज्यात नवे राजकीय समिकरण जन्माला येत आहे. ठाकरे गट-वंचितमध्ये युती झालेली असली तरी उद्धव ठाकरे यांच्याकडून वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न होत आहे. असे असतानाच आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार आहोत, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यावरच आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना आम्ही चालतो. मात्र राष्ट्रवादीला चालत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’ने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा >>>> उदय सामंतांचे संजय राऊतांना खुले आव्हान, ‘त्या’ आरोपांवर बोलताना म्हणाले; “सिद्ध झाले नाही तर…”
अजित पवार यांचे विधान मी बारकाईने ऐकलेले आहे, पण…
मात्र वंचितचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी अलीकडेच केलेली वक्तव्ये आणि शरद पवार यांच्या युतीसंदर्भातील विधानामुळे वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र दुसरीकडे आम्ही वंचितला सोबत घेण्यास तयार आहोत, असे अजित पवार म्हणालेले आहेत यावरच बोलताना “अजित पवार यांचे विधान मी बारकाईने ऐकलेले आहे. अजित पवार बंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास तयार आहेत. मात्र त्यांनी हे माझे व्यक्तिगत मत आहे. माझ्या पक्षाचे तसे मत नाही, असे सांगितलेले आहे. माझ्या पक्षाला वंचित चालत नाही. मात्र मला चालते, असे अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा >>>> शरद पवारांबरोबर अगोदरच ठरलं होतं का? पत्रकार मृत्यूप्रकरणावरील प्रश्नाला राऊतांनी दिले उत्तर; म्हणाले “हा मुद्दा…”
…अशी सरळ माझी मागणी होती
“२०१९ साली लोकसभा निवडणुकीत आम्हीच पुढाकार घेतला होता. या निवडणुकीत आमची एमआयएमशी युती होती. आम्ही तुमच्यासोबत युती करण्यास तयार आहोत, असे मी म्हणालो होतो. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र होते. मागील पाच निवडणुकांत ज्या जागांवर तुम्ही कायम पराभूत झालेले आहात, त्या १२ जागांपैकी तुम्हाला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या द्या, अशी माझी सरळ मागणी होती. त्यावेळी वंचित, एमआयएममध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची उत्सुकता नव्हती. त्यामुळे आम्ही ती मागणी केली होती,” अशी आठवण प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली.
हेही वाचा >>>> पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ, आता खुद्द संजय राऊतांनीच दिलं स्पष्टकीरण, म्हणाले, “हा आरोपी…”
उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांना यश योवो…
“आज आम्ही शिवसेनेसोबत आम्ही बसलो आहोत. उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीला वंचितने सोबत घ्यावं, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही त्यात यश आलेले नाही. त्यांचे प्रयत्न सुरू आहे. त्याला यश येऊदेत,” अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.