भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत करून यात असलेली व्यक्ती ही किरीट सोमय्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते या व्हिडीओवरून सोमय्या आणि भाजपाला लक्ष्य करत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बातचित केली. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांना किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवर प्रतिक्रिया विचारल्यावर ते संतापले. त्यांनी आधी विचारलं कोण किरीट सोमय्या? तसेच प्रकाश आंबेडकर प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले, कोणाचंही नाव घ्यायचं आणि तुमचा टीआरपी वाढवायचा, असं सगळं सुरू आहे. रस्त्यावर दिगंबर साधू फिरतात ना, त्यांचे हवे तितके फोटो काढा आणि दाखवा तुमच्या टीव्हीवर, टीआरपीसाठी.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनीही सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. देशमुख म्हणाले, सध्या किरीट सोमय्या यांची घरची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. ते मुलाच्या आणि कुटुंबाच्या नजरेतून उतरले आहेत. किरीट सोमय्या माझे वडील आहेत, असं सांगायची हिंमतही त्यांच्या मुलांमध्ये नाही.

हे ही वाचा >> सरकारला नेमका किती आमदारांचा पाठिंबा? एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा; म्हणाले…!

दरम्यान, कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित स्पष्टीकरण दिलं आहे, तसेच कारवाईची मागणी केली आहे. या पत्राची माहिती देताना सोमय्या म्हणाले. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झाला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा कथित व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे.