आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार येथेपर्यंत एकमत आहे. मात्र, महाविकास आघाडीचं काय, तेव्हा शिवसेनेकडून म्हटलं की, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. युतीबाबत सोमवारी ( ५ नोव्हेंबर ) महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असं वाटलं होतं. त्या बैठकीत तसा कोणताही निर्णय झाला नाही. पण, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली म्हणजे विषय पुढे ढकलणे, अशी प्रतिक्रिया वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

“महापालिका अथवा विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. तुमचा हा गोल्डन पीरियड आहे. त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात राजकीय समजोता झाला नाही. त्यामुळे कोणत्या जागा कोणी लढवायच्या याचं गोल्डन पीरियडमध्ये वाटप झालं असतं, तर अधिक चांगलं झालं असते,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

हेही वाचा : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळी भीमशक्ती माझ्याबरोबर असल्याने…”

“पण, चर्चेला काही अर्थ नसतो. हा गोल्डन पीरियड आहे. कोणत्या जागा मिळतील, कोणत्या नाही मिळणार हे स्पष्ट झालं की, ती संघटना लढण्यास मोकळी असते. ‘सकारात्मक’ चर्चा झाली म्हणतो आणि विषय पुढे ढकलतो. तेव्हा तुम्ही गोल्डन पीरियड वाया घालवत आहात. त्यामुळे युती होईल की नाही होईल, याची शंका येते,” असा प्रश्नचिन्ह प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी…”

“महाविकास आघाडीच्या बैठकीत युतीबाबत ‘सकारात्मक’ चर्चा झाली हा शब्द वापरणे फसवेगिरीचा प्रकार आहे. स्वत:लाच फसवणे असे मी मानतो. कारण, जिथे निर्णय घ्यायचं नाही तिथे आमची चर्चा झाली एवढचं सांगतो. पण, त्या चर्चेत फलस्वरूप काय नाही. उद्धव ठाकरेंनी अखरेचा निर्णय घ्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीशी चर्चा करून एकतर याबाजूला किंवा त्याबाजूला जायलं हवं,” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.