राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीवर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला. यानंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा आरक्षणासंदर्भात आता शरद पवार हे लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी सांगितली. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी एक राजकीय सल्लाही दिला आहे. “मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा २८८ जागा लढवल्या पाहिजेत”, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : Girish Mahajan : “मनोज जरांगे माझ्यावरच…”, गिरीश महाजनांची खंत; म्हणाले, “मराठा समाजाची फसवणूक…”

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसंदर्भात सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. ते पुन्हा उपोषणाला बसण्याची शक्यता आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांना माझं सांगणं आहे की, त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी २८८ जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीसंदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा आशयाचे पत्र द्यायचं असं सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं. ते पक्ष सर्वांनाच पाठवायचं आहे. मात्र, अद्याप तरी वंचित बहुजन पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पत्र आलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे सांगावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या आघाडीबाबत काय म्हणाले?

“तिसऱ्या आघाडीच्या चर्चांमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. राजकारणात अनेक डावपेच असतात. त्यामुळे त्यापैकी हा एक डावपेच आहे, असं मी मानतो. असा काही प्रस्ताव आल्यावर भविष्यात पाहू”, अशी सूचक प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

‘त्या’ आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार?

“विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची जी मत फुटलेली आहेत. तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षाची मतेही फुटलेली आहेत. पाच मते काँग्रेसची फुटली आहेत आणि इतर दोघांची एक-एक मत फुटलेली आहेत. पण सातही फुटलेल्या मतांचं खापर काँग्रेसवर फोडलं जात आहे. काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत, त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार? याचा खुलासा केला पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.