Prakash Ambedkar on Somnath Suryawanshi judicial custody death in Parbhani : परभणी येथील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला होता. याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान आता या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सोमनाथ सुर्यवंशी असून प्रकाश आंबेडकरांनी त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, “परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक, भयानक आणि असह्य करणारे आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, याहून असहनीय काय असेल!”

tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
buldhana students hospitalized loksatta
बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Sex with cow brazil man dies
Brazil: गाईबरोबर अनैसर्गिक कृत्य करायला गेला; “गाईनं लाथ मारताच…”, पुढं जे झालं त्यांना सर्वांनाच धक्का बसला
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू

पुढे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, “त्यांचा (सोमनाथ सुर्यवंशी) मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये केले जावे आणि फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण केले जावे”. याबरोबरच प्रकाश आंबेडकर यांनी “आम्ही न्यायासाठी लढू!”, असेही म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधून परभणी पोलीसांनी दलित महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“व्हिडीओमध्ये रुग्णालयात दाखल दलित महिलेला परभणी पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलीसांनी तिच्या मांड्या आणि पोटावर उभे राहून तिच्या डोक्यावर व हातावर लाठ्या मारल्या. तिला शौचालय वापरायचे आहे असे तिने म्हटल्यावर पोलीसांनी तिचे पाय पसरले आणि तिच्या पायांवर मारले.तिचा एक हात फ्रॅक्चर झाला असून, तिच्या डोक्याला झालेल्या जखमांसाठी तिला सीटी स्कॅन करावे लागेल”, असे सांगण्यात आले.

हेही वाचा>> Ministers Oath Taking Ceremony : रोहित पवार, जयंत पाटीलही शपथ घेणार का? सुनिल तटकरेंनी महायुतीच्या शपथविधीपूर्वी दिली महत्त्वाची माहिती

“हे एकमेव प्रकरण नाही! परभणीत आंबेडकरी वस्त्या लक्षित पोलिस अत्याचाराची अशी शेकडो प्रकरणे समोर आली आहेत! शेकडो!! हे लिहितांना आपले डोळे राग आणि अश्रूंनी भरून आले आहेत”, असेही पोस्टमध्ये वंचित आघाडीने म्हटले आहे.

Story img Loader