जालना : राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. राष्ट्रवादीशी युती करण्यास आमची का तयारी नाही हे योग्य वेळी सांगू, असे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते जालना येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने निवडणुकांसाठी आम्ही आमची तयारी करीत आहोत. युतीसाठी आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना आणि काँग्रेसकडे निरोप पाठविला असून आता काय करायचे, हा त्यांचा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 शिवसेनेत उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुणाचे पारडे जड आहे याचा निर्णय निवडणुकांच्या निकालातच लागेल. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकमेव कार्यक्रम देशाची घटना बदलण्याचा आहे. शिवसेना आणि आमच्यात मतभेद आहेत. परंतु ते घटना बदलावी, असे म्हणत नाहीत. काँग्रेस पक्ष घटनेचाच एक भाग असल्याचे आपण मानतो.