देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. “लोकसभा निवडणुकीत हे एकत्र आले नाही तर आम्हाला ४८ जागा स्वबळावर लढवाव्या लागतील. त्याही ताकदीनं लढवल्या पाहिजेत,” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साने गुरूजी यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत प्रकाश आंबेडकर बोलते होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळालं पाहिजे. यासाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्ये महत्वाची आहेत. अन्य राज्यांत आपल्याला काम करता येणार नाही. पण, महाराष्ट्रात काम करता येईल.”

हेही वाचा : “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिक त्याग करणारी काँग्रेस आज…”, इंडिया आघाडीबाबत राऊतांचं मोठं विधान

“एकत्र येतील, हे शक्य दिसत नाही”

“लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र यावं, ही माझी भावना आहे. पण, मला हे शक्य दिसत नाही. उद्या हे एकत्र आले नाही तर आम्हाला लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढवाव्या लागतील. त्याही ताकदीनं लढवल्या पाहिजेत,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : राष्ट्रवादी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविणार? निवडणूक आयोगाचा उल्लेख करत सुनील तटकरे म्हणाले…

“प्रकाश आंबेडकरांशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात”

दरम्यान, शुक्रवारी खासदार संजय राऊत यांनी जागावाटबाबत भाष्य केलं होतं. “महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. आम्ही २३ जागा लढवणार असल्याचं दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar said vanchit bahujan aghadi 48 seats contested loksabha election ssa
Show comments