Prakash Ambedkar On Amit Shah Statement and BJP’s Campaign Against Congress : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (१७ डिसेंबर) राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून अमित शाह व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्ट्समध्ये काँग्रेसने कशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला याबद्दल काही दावे केले आहेत. मोदींनी यावेळी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत दोन वेळा पराभव केल्याचा पुनरुच्चार केला आहे. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी “त्या पराभवासाठी मी काँग्रेसला दोष देणार नाही” असं म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अमित शाह यांनी आता माफी मागावी अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. तसेच काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं असे दावे करत आहेत. दरम्यान, काही माध्यमं देखील त्यासंबंधीच्या बातम्या दाखवत आहेत. हा सगळा प्रकार पाहून प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपा लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

हे ही वाचा >> “राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पत्रकाराने मला विचारले की, बाबासाहेबांना अधिक अपयशी कोणी केले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपा की काँग्रेसने? बाबासाहेबांच्या आरक्षण धोरणाला काँग्रेसने विरोध केला होता हे खरे आहे. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभेनेही बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष बाबासाहेबांच्या आर्थिक धोरणाचे पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपा स्वतःहून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काँग्रेसवर दोषारोप करणे म्हणजे “भांडे किटलीला काळे म्हणत आहे”.

हे ही वाचा >> “राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

भाजपाच्या दाव्यावर प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

मुंबई आणि भंडारा येथील निवडणुकींमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाल्याबद्दल आपण काँग्रेसला दोष द्यायला तयार नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांनी सांगितलं की, “मी काँग्रेसला दोष द्यायला तयार नाही. कारण काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे त्यावेळचे धोरण होते. फक्त काँग्रेस पक्षच नव्हता तर कम्युनिस्ट पक्षानेदेखील विरोध केला होता. कामगार लढ्यात एकत्र लढल्यानंतरही कम्युनिस्ट पक्षाने स्वत:ची ६० हजार मतं मध्य मुंबई मतदारसंघात कुजवली होती”.

Story img Loader