Prakash Ambedkar On Amit Shah Statement and BJP’s Campaign Against Congress : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (१७ डिसेंबर) राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून अमित शाह व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्ट्समध्ये काँग्रेसने कशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला याबद्दल काही दावे केले आहेत. मोदींनी यावेळी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत दोन वेळा पराभव केल्याचा पुनरुच्चार केला आहे. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी “त्या पराभवासाठी मी काँग्रेसला दोष देणार नाही” असं म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा