देशात आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजू लागलेलं असताना दुसरीकडे इंडिया आघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपासोबत घरोबा केला आणि बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रमुख घटकपक्ष सोडून गेल्यामुळे आता इंडिया आघाडीचं भवितव्य अधांतरी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच इंडिया आघाडीतील एक घटकपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीतच नुकतेच मविआमध्ये दाखल झालेले प्रकाश आंबेडकर यांनी “इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही”, असं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाविकास आघाडीची बैठक

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावरून बरीच चर्चा रंगली होती. प्रकाश आंबेडकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून पाठवलेल्या पुंडकरांनी आपला बैठकीत अवमान झाल्याची तक्रारही बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी उपस्थिती लावली. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘वंचित’चा आधी अपमान, मग समावेश; प्रकाश आंबेडकर म्हणतात, “आमची प्राथमिकता…”

“मविआची इंडिया आघाडी होऊ नये”

माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूलाच संजय राऊत उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीबाबत खोचक विधान केलं. “मविआ आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये हे आमचं बैठकीत ठरलं आहे. आम्ही ही दक्षता घेऊ. त्यामुळे ताक जरी असलं, तरी फुंकून फुंकून प्यायचं असं मी ठरवलंय. जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यावर सध्या निम्मी चर्चा झाली असून निम्मी चर्चा बाकी आहे”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

“इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेस हे शेवटचे मित्रपक्ष राहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झाले आहेत. दोघे वेगळ्या मार्गाने चाललेत अशी माझी माहिती आहे. तसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण सत्य परिस्थिती तशी आहे”, असा दावाही त्यांनी यावेळी केला.