मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं असून यावरील सुनावणी संपली आहे. सुनावणी संपली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. कोणत्याही क्षणी हा निकाल लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील, अशी मतं घटनातज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत.

हेही वाचा- “संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही…”, अजित पवारांचा उल्लेख करत संजय शिरसाटांची टीका!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत घडामोडी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- पिक्चर अभी बाकी है? अजित पवारांच्या नाराजीवर गुलाबराव पाटलांचं सूचक विधान, म्हणाले…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला, तरी कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. त्यावेळीचे जे उप सभापती यांच्या निर्णयाला न्यायालयाने जी स्थगिती दिली होती. ती स्थगिती कदाचित उठवली जाईल, अशी परिस्थिती आहे. हे प्रकरण राज्यपाल आणि कार्यकारिणी मंडळ यांच्यातील आहे. त्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar statement over supreme court hearing maharashtra political dispute mla disqualification rmm
Show comments