Prakash Ambedkar on Pooja khedkar Case : भारतीय नागरी सेवेतील प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या विविध कारनाम्यामुळे त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करून त्यांना मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रावर परत येण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही त्या तिथे परतल्या नाहीत. दरम्यान, त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालाय की नाही याचीही चौकशीचे आदेश दिले आहेत. चारही बाजूने पूजा खेडकर या पुरत्या अडकलेल्या असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्याविषयी मत देताना सावध भूमिका घेतली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“याप्रकरणी कायदेशीर खटला होऊ द्या. या प्रकरणात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरची मीडियाने चौकशी का केली नाही? ती कायदेशीर कारवाईला सामोरी जाईल आणि आपली बाजू मांडणार असल्याचं तिने वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे खटल्यापूर्वीच तिला दोषी ठरवू नये”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाल.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा >> पूजा खेडकर मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रातही गैरहजर! पुणे पोलिसांच्या चौकशीलाही आल्या नाहीत!

दिलीप खेडकरांनी लढवली होती निवडणूक

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरून निवडणूक लढवली होती. असं असतानाही पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करून युपीएससीची दिशाभूल केल्याचा आरोप केला जातोय. तसंच, आई-वडिल विभक्त झाले असून आमचे शुन्य उत्पन्न आहे, असंही त्यांनी एका मॉक इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत.

पूजा खेडकर चौकशीला गैरहजर

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर पूजा खेडकर यांनी छळाची तक्रार केली होती. या तक्रारीप्रकरणी चौकशीसाठी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दोनदा समन्स पाठवली. परंतु, त्या एकदाही हजर राहिल्या नाहीत. तसंच, मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांना २३ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्या तिथेही हजर राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या नक्की कुठे गेल्या आहेत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा >> पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झालाय का? केंद्र सरकारला संशय, पोलिसांना चौकशीचे आदेश!

प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरला क्लिन चीट

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना वाय.सी.एम रुग्णालयाने सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. यानंतर वायसीएम रुग्णालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना दिले होते. चौकशीअंती दिव्यांग प्रमाण पत्राबाबत संबंधित डॉक्टरांना क्लिन चिट देण्यात आली आहे. चौकशीत कोणीच दोषी आढळले नसल्याची माहिती राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.

युपीएससीकडून गुन्हा दाखल, चौकशी सुरू

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे. विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई सुरु केली. यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची आयएएसची निवड का रद्द करू नये? अशी नोटीस पाठवली आहे. राज्य शासनाने चौकशी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे. दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. यामुळे पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.