Prakash Ambedkar : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळ्याच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तसंच भाषणं, मुलाखती, सभा, रॅली हे देखील सगळं वाढलं आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला आणि निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी राहुल गांधींवर टीका करताना अपशब्द वापरले आहेत.

एक मत असं आणा की..

प्रकाश आंबेडकर लातूरच्या सभेत म्हणाले, “आपल्याला म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे यासाठी तुमच्याबरोबर आणखी एक मत आणा. हे आणखी एक मत म्हणजे तुमच्या भावाचं, तुमच्या बायकोचं किंवा तुमच्या कुटुंबातलं नाही. तर हे एक मत असं हवं आहे जे आपल्याला विजय मिळवून देईल.” असं प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले.

uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
What Raul Gandhi Said?
Rahul Gandhi : “संघ आणि भाजपाचे लोक वेगवेगळ्या छुप्या शब्दांमागे लपून, संविधान..” राहुल गांधीचं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर यांची लातूरमध्ये सभा

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भारतीय संविधानाच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि यावेळी त्यांच्या व्यंगात्मक भाषणात राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाच्या रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपले विचार व्यक्त केले. राहुल गांधींच्या मागील विधानांच्या संदर्भात त्यांनी त्यांच्या काही निर्णयांना विरोध केला.

हे पण वाचा- मेहकरात वाटपासाठी ४० खोके आलेत, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप

राहुल गांधींबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

राहुल गांधी तुम्हाला चु#+#$ बनवत आहेत. यापेक्षा वापरण्यासाठी दुसरा शब्द माझ्याकडे नाही. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार हे एका बाजूला आणि संविधान वाचवणार असे दुसऱ्या बाजूला. जो संविधानप्रेमी आहे त्यांनी भाजपाला लाथाडलं. त्यामुळे मोदी आता संविधान डोक्याला लावल्याशिवाय भाषणच करत नाहीत. मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की मागच्या पाच वर्षांत फार मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. मात्र वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठिशी उभी राहिली. काँग्रेस, डावे कुणीही आले नाहीत. त्यामुळे मुस्लिम बांधवांना माझं आवाहन आहे की यावेळेस वंचितच्या बाजूने उभे राहा असंही प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी म्हटलं आहे.

मुस्लिम बांधव आमच्या बाजूने उभे का राहात नाहीत?-प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात ३२ जागा अशा आहेत जिथे एका बाजूला उद्धव ठाकरेंनी सेना आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंची सेना आणि तिसऱ्या बाजूला वंचितचा उमेदवारआहे. उलेमांच्या संघटना, मौलवी यांना माझा सवाल आहे की एकनाथ शिंदे तुमच्या बाजूने नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीच्या विरोधात गेली. बाबरी मशीद शहीद केली असा डंका ते मिरवतात. वंचित बहुजन आघाडी मागची पाच वर्षे उभी राहिली आहे तर मग वंचितला पाठिंबा देण्यात तुम्हाला लाज का वाटते आहे? असा सवाल प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी केला आहे.