आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांच्या सातत्याने बैठका आणि चर्चा होत आहेत. परंतु, मविआ अद्याप जागावाटपाचा निर्णय घेऊ शकलेली नाही. दुसऱ्या बाजूला, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येण्यास इच्छूक आहे. परंतु, वंचितबाबतचा निर्णयही मविआ नेत्यांनी घेतलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीने मविआ नेत्यांना पत्र लिहून जागावाटपाबाबत निर्णय घेण्यास सुचवलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पत्र लिहिलं आहे. हे पत्र संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्यासारख्या मविआमधील इतर प्रमुख नेत्यांनाही पाठवण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा